Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदाड ग्रामपंचायतीच्या उपक्रमाने भारावल्या कोरोनाने विधवा झालेल्या भगिनी (व्हिडिओ)

पाचोरा, नंदू शेलकर  । तालुक्यातील शिंदाड येथील ग्रामपंचायत सदस्यांनी रक्षाबंधन सण गावातील कोरोनाने पतीच्या मृत्यूनंतर वैधव्य आलेल्या भगिनीकडून राखी बांधून घेत  त्यांना रक्षणाचे वचन देत साजरा केला.   

शिंदाड येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून गावातील कोरोनाने कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्याने शोकमग्न विधवा भगिनींना रक्षाबंधनाचा सण अनोखी भेट देत घरोघरी जाऊन साजरा केला. शिंदाड गावातील १३ कुटुंब प्रमुखांचे कोरोनाने निधन झाले. ह्या १३ विधवा भगिनींना ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्येकीच्या घरी जाऊन विधवा भगिनींकडून राख्या बांधून घेत साडी, चोळी व मिठाई भेट देऊन आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देत रक्षाबंधन सण साजरा केला. शिंदाड ग्राम पंचायत सदैव आपल्या सुख दुःखात सोबत राहील. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देत धीर दिला. यावेळी भाजपचे जि. प. सदस्य मधुकर काटे पाटील, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य संदिप सराफ, विलास पाटील, स्वप्नील पाटील, अकील तडवी, समाधान पाटील, उज्वला पाटील, कांताबाई पाटील, नजमाबाई तडवी, कांचन परदेशी, धनराज पाटील, इंदल परदेशी, नामदेव गुरुजी, केशव पाटील, श्रीराम धनगर, बापू मुठ्ठे, विनोद तडवी, तगदिर तडवी, मनीषा वाणी, विजया पाटील, कर्मचारी प्रल्हाद शिंपी, रविंद्र पाटील उपस्थित होते.

 

 

Exit mobile version