Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाहु महाराज हॉस्पिटलसमोरून तरूणाचा हातातील मोबाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहु महाराज हॉस्पिटलसमोरून मोबाईलवर बोलत असतांना तरूणाच्या हातातून ७ हजार किंमतीचा मोबाईल अज्ञात तीन चोरट्यांनी हिसकावून  लांबविल्याची घटना शुक्रवारी ६ मार्च रोजी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनकर शामराव तायडे (वय-३०) रा. मनुर खूर्द ता.जि.जळगाव ह.मु. आयएमआर कॉलेजच्या पाठीमागे जळगाव. हा तरूण शिक्षणासाठी जळगावात राहतो. ५ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटलसमोरील लाठी प्लाझाजवळ घरच्याशी मोबाईलवर बोलत असतांना अज्ञात तिघांनी दुचाकीवर येवून हातातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून दुचाकीने पळ काढला. आराडाओरड केली मात्र तो पर्यंत संशयित तिघे फरार झाले होते. याप्रकरणी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीसात दिनकर तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश पाटील करीत आहे. 

Exit mobile version