Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाहुनगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहूनगरातील ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजेपुर्वी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शाहू नगरातील रहिवासी प्रशांत अशोक साळुंखे (३५) यांनी बुधवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपुर्वी त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना देवकर महाविद्यालयातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन विसपुते यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास संजय भांडारकर हे करीत आहे.

Exit mobile version