शाहीर शिवाजीराव यांचे उद्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पोवाड्याचे सादरीकरण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गुढीपाडवा निमित्त मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे २२ मार्च गुढीपाडवा निमित्त नववर्षाच्या प्रारंभ निमित्त मुंबई दूरदर्शन ने “उत्सव लोककलांचा” या कार्यक्रमाचे नुकतेच चित्रीकरण गेल्या महिन्यात केले. पाचोरा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांचे सह्याद्री वाहिनीवर पोवाड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

 

यामध्ये पोवाडा, भारुड, गोंधळ तसेच विविध लोककलांचे सादरीकरण उद्या बुधवार दि. २२ मार्च रोजी दुपारी दोन वाजता व रात्री आठ वाजता संपन्न होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या मराठी नववर्षाच्या दिनानिमित्त मुंबई दूरदर्शन चा हा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर शिवाजीराव पाटील यांनी लिखित भारतातल्या विविध महापुरुषांचा पोवाडा तसेच यामध्ये अहमदनगरचे शाहीर भारुडकार हमीद सय्यद “गाडी घुंगराची” फेम विलास अटक यांच्यासोबत पारंपारिक गोंधळ लावणी इत्यादी लोककलांचे सादरीकरण गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणार असून शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या पोवाडा सोबत सात संगत देणार आहेत ते शाहीर बाबुराव मोरे, शाहीर कुणाल राऊळ, नामदेव पाटील, जितेंद्र भांडारकर, राजेंद्र जोशी, सुरज राऊळ, रामसिंग राजपूत इत्यादी खानदेशातील लोककलावंतांचं सादरीकरण देखील यामध्ये होणार आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठीचे आवाहन शाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी यांनी केलेले आहे. यापूर्वी मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर हिंदी पोवाडा याचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हिंदी पोवाड्याचे सादरीकरण देखील केलेले आहे.

Protected Content