Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाहीन बाग असलेल्या ओखला मतदारसंघात भाजप दारूण पराभवाच्या छायेत !

kejriwal aap

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीच्या निवडणुकीत ज्या शाहीन बाग आंदोलनाचा प्रचारात विखारी वापर करण्यात आला, तोच शाहीन बाग परिसर ज्या मतदार संघात येतो, त्या ओखला मतदार संघात भाजप दारूण पराभवाच्या छायेत आहे.

 

आप दिल्लीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळविणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आपने आपल्या कामावर मते मागितली तर भाजपने राष्ट्रवाद, सीएए हे मुद्यांना जास्त महत्व दिले होते. ज्या शाहीन बाग आंदोलनाचा दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारात वापर करण्यात आला तो ज्या मतदार संघात येतो त्या ओखला मतदार संघात भाजपचे उमेदवार ब्रहम सिंह यांचा दारूण पराभवाच्या छायेत आहे. तर आपचे विद्यमान आमदार अमनतुल्ला खान यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

Exit mobile version