शासकीय हॉस्पिटलमधून लॅपटॉपसह दोन मोबाईल लांबविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोहाडी येथील शासकीय हॉस्पिटलमधील कार्यालयातून लॅपटॉप आणि दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये अशोक नाथू पासवान (वय-४२) रा. धरमपुरा ठिका ता.जि. वैशाली बिहार ह.मु. मोहाडी शासकीय हॉस्पिटल हे सेंटींग काम करतात. बुधवार ११ मे रेाजी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या शासकीय हॉस्पिटलच्या कार्यालयात ठेवलेले १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शत्रुघन मनौत महतो रा. तुरकी चरूवा जि. मुझफरपूर, बिहार यांने चोरून नेले आहे. असा संशय अशोक पासवान यांनी व्यक्त केला आहे. अशोक पासवान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून संशयिताविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवार १२ मे रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.

Protected Content