Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ मे रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सय्यद असिफ सय्यद शाहिद (वय-५२, रा.  जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समोर, दीक्षितवाडी,जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ११ मे रोजी त्यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच १५ सीक्यू ८६४९) ही दुचाकी पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही बाब सकाळी १० वाजेच्या सुमारास लक्षात आली. त्यानुसार सय्यद असिफ यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, त्यांना त्यांची दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर मंगळवार १६ मे रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

Exit mobile version