Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दंतचिकित्सा सुविधेला सुरूवात

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचारची अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाली आहे. तोंडाच्या कर्करोगावर देखील उपचार होणार असून दंतरुग्णांनी ओपिडी काळात लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शासकीय रुग्णालयात कोरोना महामारी व्यतिरिक्त इतर व्याधींच्या आजारावर गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरू झाले आहे. त्यात दंतोपचार विभाग देखील अद्ययावत झाला आहे. त्यात मौखिक आजार, दातांची तपासणी, दात काढणे, दात बसविणे, रूट कॅनलद्वारे दातांचे संरक्षण करणे हि सेवा दिली जात आहे. यासह वयोवृद्ध व्यक्तींच्या दातांच्या कवळ्या, कृत्रिम दात, लहान मुलांच्या दात येण्याबाबतच्या समस्या, अक्कलदाढ काढणे याबाबत तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करून सेवा देत आहे. यात कक्ष क्र. २१४ मध्ये ओपीडी काळात सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान सरकारी माफक दरात दंतोपचार सुरु झाले आहे. एका वेळी ४ रुग्ण तपासणी करण्याची क्षमता देखील विकसित करण्यात आली आहे.

यामध्ये तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करणे, उपचार करणे व गरज पडल्यास शस्त्रक्रिया करणे हि सुविधा देखील अद्ययावत पद्धतीने सुरु झाली आहे. दंतोपचार विभागात प्रमुख डॉ. इम्रान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनुराधा वानखडे, डॉ. राखी यादव, डॉ. सतीश सुरळकर, तंत्रज्ञ क्षितिज पवार, सहाय्यक सूर्यकांत विसावे सेवा देत आहेत. दंतोपचार करण्यासाठी लाभार्थी रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी केले आहे.

Exit mobile version