Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार : अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) काम न करता, शासकीय निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

 

फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी अधिकाऱ्यांनी काम न करताच पैसे काढल्याचे विधानसभेत मान्य केले. त्यावर हा सरकारच्या तिजोरीवर दरोडा आहे असे सांगत, याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला दिले. त्यावर या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून बडतर्फीची कारवाई केली जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली.

Exit mobile version