Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते शासकीय धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.

रावेर येथील महेंद्र पाटील यांच्या धान्य गोदाम परिसरात रविवार रोजी केंद्र शासनाच्या शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते काटा पुजन करून करण्यात आला. यावेळी ३१६ शेतकऱ्यांनी ज्वारीला २ हजार ७३८ रुपये भावाने नोंदणी केली. तर मकाला १ हजार ८७० रुपये भाव असून २३३ शेतक-यांनी नोंदनी केली आहे.

याप्रसंगी शेतकरी बांधवांचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी. आर. पाटील, व्हाइस चेअरमन किशोर पाटील, पुरवठा निरिक्षक अतुल नागरगोजे, मॅनेजर विनोद चौधरी आदी उपस्थित होते.

Exit mobile version