Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय कापुस खरेदी केंद्र सुरू करा

पाचोरा, प्रतिनिधी ! शासकीय कापुस खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत असून व्यापारी त्यांचा गैरफायदा घेत आहेत. शासकीय कापुस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड ( पाचोरा) च्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना निवेदन दिले

सततच्या पावसाने व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिक घेण्यासाठी शेतकऱ्याने लावलेला पैसा मिळाला नसुन शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने आलेला कापुस तात्काळ विकणे गरजेचे आहे. शासकीय कापुस खरेदी केंद्र सुरू नसल्याने कापुस व्यापाऱ्यांना कमी भावात विकणे भाग पडत आहे . यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे.

. शासकीय कापुस खरेदी केंद्र तात्काळ सुरु न केल्यास आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल. असेही निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले आहे. यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष जिभाऊ पाटील, शहर अध्यक्ष सुरेश शिंदे, उपतालुकाप्रमुख संजय राठोड, कार्याध्यक्ष सर्जेराव पाटील, उपशहर अध्यक्ष सचिन पाटील, सचिव विशाल परदेशी, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मोशिन पिंजारी, संपर्क प्रमुख गफ्फार पटेल, विजय जाधव, अमर पाटील, हेमराज पाटील, रहिस शेख, गटप्रमुख गोपाल पाटील (कोल्हे) सह पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version