Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्याला ३ वर्षे सश्रम कारावास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्षाचा सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जुलै २०१७ मध्ये आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी राहत असताना विजय प्रकाश घोडेश्वर (वय-१९) रा.  भडगाव जि.जळगाव याने पीडित मुलगीच्या शाळेत व इतर रस्त्यावर तिचा पाठलाग करून तिला थांबवून तिचा हात पकडला होता. या संदर्भात पिडीत मुलीच्या मामाने संशयित आरोपीला पकडून पाचोरा पोलीस ठाण्यात जमा केले होते. याबाबत पीडित मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून विजय घोडेस्वार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. जळगाव जिल्हा न्यायालयाच्या पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. महाजन यांच्या न्यायालयासमोर खटला चालविण्यात आला. यामध्ये पीडीतेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. साक्ष व पुराव्या अंती न्यायालयाने विजय प्रकाश घोडेस्वार (वय-१९) दोषी ठरवत त्याला विविध कलमान्वये तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंड. आणि दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरीचे शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी पोहेकॉ विजय पाटील यांनी सहकार्य लाभले.

Exit mobile version