Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शार्टसर्कीटमुळे नवीपेठेतील दुकानाला आग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीपेठ येथील नाथ प्लाझा समोरील भारत एजन्सीच्या दुकानाला सोमवारी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने ही आग विझविण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नवीपेठ परिसरात नाथ प्लॉझा समोरील भारत एजन्सीचे होलसेल दुकान आहे. हे दुकान गोपाल पालोड यांच्या मालकीचे असून पतंजलीचे प्रॉडक्ट ठेवले जातात. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानातील विद्यूत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे अचानकपणे दुकानातील फर्निचरला आग लागली. ही घटना घडल्यानंतर दुकान मालक गोपाल पलोड यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून आगीची माहिती दिली. महापालिकेचे काही वेळातच तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन बंबाने ही आग विझविण्यात आली. या आगीत किती नुकसान झाला याची माहिती उपलब्ध झालेली नाही. यावेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. आगीच्या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version