Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा …

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  भडगाव तालुक्यातील माहेर असणाऱ्या पीडितेच्या सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला पतीसह सासरच्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तीन महिने गुन्हा दाखल होऊनसुद्धा आरोपींना अटक करण्यात आली नसून त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पिडीताने निवेदनाद्वारे जळगावच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

दरम्यान या गुन्ह्यात सासऱ्याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपी फरार असून त्यांनी जळगाव जिल्हा न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते.  मात्र ते न्यायालयांनी फेटाळले आहे.

 

निवेदनात म्हटले आहे , भडगाव तालुक्यात एका गावात राहणाऱ्या पीडितेचा विवाह नाशिक येथील महेश सुधाकर देवरे याच्याशी हिंदू रितीरिवाजनुसार दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी भडगाव तालुक्यात झाला होता . पीडितेच्या वडिलांनी काहीशी शेती विकुन १० लाख रुपये विवाह सोहळ्यात खर्च करून मुलीला १० तोळ्यांचे  सोन्याचे दागिने बनवून दिले होते . लग्नानंतर नाशिक येथे सासरी गेलेल्या पीडित विवाहितेसोबत पती महेश देवरे याने अनैसर्गिक संबंध आणि कृत्य करण्यास भाग पडले होते . तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिला असे करण्यास भाग पाडले जात होते . तसेच सासू ,नंदा या वेश्या व्यवसाय करीत असल्याचे पीडितेला समजले होते . सासरा आरोपी सुधाकर देवरे आणि मावस दीर मिलिंद पाटील या दोघांनी पीडितेवर अत्याचार केले .

 

पती महेश देवरे ,सासरे सुधाकर  देवरे,सासू सरला देवरे, नणंद प्रतिक्षा देवरे ,दुसरी नणंद दक्षा देवरे,मावस दीर मिलिंद पाटील , सुभाष पाटील सर्व रा. २९७/३/७ सेल्स टॅक्स, ऑफीस जवळ, आनंद नगर, पाथर्डी फाटा, नाशिक,वरील सर्व आरोपींनी पीडितेला असे कृत्य केल्यास तुला खूप मजा येईल . दोन्ही नंदा यांनीही आम्ही हेच कृत्य करून खूप पैसे कमवीत असून तू देखील कर असे प्रवृत्त करीत होते . त्यांच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून माहेरी परतल्यानंतर  पीडितेने भाऊ आणि वडील यांच्यासोबत भडगाव पोलीस ठाणे गाठून २९ मे २०२२ रोजी रीतसर सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार देऊन गुन्हा दाखल केला . मात्र या गुन्ह्यात सासरा सुधाकर देवरे यांना पोलिसांनी अटक केली असून जवळपास तीन  महिन्यांचा कालावधी उलटून देखील दाखल गुन्ह्यातील वरील सर्व आरोपींवर अद्याप कारवाई झालेली नाही . त्यांना त्वरित अटक करण्यात येऊन कठोर कारवाई  करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Exit mobile version