Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शामा प्रसाद मुखर्जी उद्यान गाळेधारकांचे भीक मांगो आंदोलन (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी ।  महापालिकेने गाळेधारकाविरोधात सुरु केलेल्या कारवाईच्या विरोधात  शहरातील १६ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारला आहे.  यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.  महापालिका प्रशसनाचा निषेध करण्यासाठी शामा प्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी  आज ३१ मार्च रोजी भीक मांगो आंदोलन करून अनोखे प्रकारे  मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

महापालिकेने अवाजवी बिल आकारणी केली असून ते बिल गाळेधारक भरू शकत नाही. महापालिकेने गाळेधारकांवर अन्याय करू नये यामागणीसाठी शामा प्रसाद मुखर्जी उद्यान व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी संकुलासमोरील रस्त्यावर कपडे काढून भीक मांगो आंदोलन करण्यात आले.  दरम्यानं आंदोलनकर्ते हेमंत जगन्नाथ परदेशी यांनी प्रतिक्रिया दिली की, शहरातील १६ व्यापारी संकलाचा बेमुदत संप सुरू आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी भास्करराव पाटील यांनी जी दुरदृष्टी ठेवून शामा प्रसाद मुखर्जी उद्यानालगतच्या दुकाने नियमानुसार ताब्यात दिले होते. जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुळकर्णी हे महानगरपालिकेचे कर्ज, रस्ते दुरूस्ती, इलेक्ट्रिक बिले भरणे, अधिकारी व कर्मचारी यांचे पगार करणे असल्यामुळे वारंवार गाळेधारकांना धमकावून पैसे वसूल करत आहे. त्यामुळे जळगाव शहरात गाळेधारकांनी बेमुदत बंद पुकारले आहे. कोरोना महामारीत गाळेधारकांची परिस्थीत नाजूक आहे. या परिस्थितीमुळे महापालिका सक्तीची वसुली करत आहे. वारंवार पैश्यांसाठी तगादा लावत असल्यामुळे गेल्या २७ मार्च पासून बेमुदत संपावर आहे. संपाचा आज पाचवा दिवस उजाळला परंतू अद्याप शहरातील १६ व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लागला नाही. महापालिकेचा निषेध करण्यासाठी आज श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानासमोर गाळेधारकांनी भिकमांगो आंदोलन केले.  या भिक मांगो आंदोलनातून  जे काही पैसे जमा होती त्या पैश्यातून आयुक्तांनी शहराचा विकास करावा असे  देखील त्यांनी सांगितले. याप्रसंगी राजू देसले, गणेश जगताप, कल्पेश सोनी, वसंत भावसार, मयूर पवार, राजेंद्र बाविस्कर, शबीर शेख सय्यद, बाबू परदेशी, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते. 

 

 

 

Exit mobile version