Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहर शिवसेनेत कोणतीच गटबाजी नाही — विलास पारकर ( व्ही डी ओ )

 

जळगाव : प्रतिनिधी । शहर शिवसेनेत कोणतीच गटबाजी नाही हे मी निसदिग्धपणे  सांगतो असे प्रतिपादन आज शिवेसेनेचे रावेर लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी सांगितले

 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्याच्या जिल्हा दौर्याच्या पार्श्वभूमीवर विलास  पारकर यांनी जळगावातील नगरसेवकांची आज बैठक घेतली या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते  पुढे  म्हणाले की , भाजप मधून शिवसेनेत आलेले नगरसेवक  विकासाच्या मुद्द्यावर आलेले आहेत काही तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास आम्ही करू आणि हे नगरसेवक अडचणीत येऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे , शिवसेनानेते संजय   राऊत हे सगळे या नगरसेवकांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे आहेत याची ग्वाही मी देतोय जळगाव शहर शिवसेनेत गटबाजी असल्याच्या , किंवा काही नगरसेवक पुन्हा भाजपकडे जाणार असल्याच्या निव्वळ वावड्या काही लोकांकडून जाणीवपूर्वक उडवल्या जात असाव्यात मात्र त्यात काहीच तथ्य नाहीय हे मी निक्षून सांगू इच्छितो नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौर्यावर आल्यावर उद्या महापालिकेतसुद्धा भेट देणार आहेत ते इथल्या नगरसेवकांची  बैठकही घेणार आहेत , सर्वच नगरसेवकांचे म्हणणे  ऐकून घेणार आहेत  आधी  काही मुद्दे जळगाव लोकसभा  क्षेत्र संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या पर्यंत पोहचल्यावर त्यावरही पक्षनेत्यांच्या पातळीवर चर्चा झाली आहे आज मी पण नगरसेवकांचे म्हणणे  ऐकून  घेण्यासाठी आलो आहे , असेही ते म्हणाले

 

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही काही  नगरसेवक पुन्हा  भाजपकडे जाणार असल्याच्या चर्चेत अजिबात तथ्य नसल्याचे  सांगितले  आम्ही महापौरपदासाठी  शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला त्यावेळीच  शिवसेना नेत्यांनी आमचा शहराच्या विकासाचा दृष्टीकोन मान्य करून आम्हाला शब्द दिला होता आणि त्या  आश्वासनाची  पूर्तता होईल अशी आम्हाला आशा आहे आमच्यावर अपात्रतेची कायदेशीर कारवाई होईल  असे  काही लोक म्हणत असले तरी कायद्याच्या पातळीवर आमचेही म्हणणे एऐकून घेतल्याशिवाय न्याय्निवाद्याचा कोणताच निर्णय होणार  नाही त्यामुळे आम्ही आमची बाजू कायद्याच्या पातळीवर भक्कमपणे सिद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न करणारच आहोत त्या दृष्टीने आम्ही गटनेता बदलण्याचाही निर्णय घेऊन या निर्णयाला महापौर आणि आयुक्तांची मान्यता मिळवलेली आहे उद्या बर्याच मुद्द्यांवर नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी सखोल आणि सविस्तर चर्चा होणार आहे ,  असेही त्यांनी सांगितले

यावेळी महापौर जयश्री महाजन , विरोधी पक्षनेते सुनील महाजन , माजी शहरप्रमुख गजानन मालपुरे , गटनेते दिलीप पोकळे  , उप गटनेते चेतन सनकत , नगरसेवक नवनाथ दारकुंडे , सचिन पाटील , पार्वताबाई भिल आदी उपस्थित होते

 

 

Exit mobile version