Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहराबाहेर जळगावचे कारागृह नेण्याचे प्रयत्न (व्हिडीओ )

 

जळगाव राहूल शिरसाळे । जळगावचे कारागृह शहराबाहेर मोठ्या आकारमानात उभारण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. मात्र जेल मोठी झाली तरी त्यात कैदी नसावेत. आणि कैद्यांनी आयुष्यात एकदा केलेली चूक ही पुन्हा न करता सर्वसामान्यांसारखे जीवन जगावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते आज जिल्हा कारागृहात चक्कीसह अन्य साधने वाटप करण्याच्या कार्यक्रमानंतर बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले कि , गायकवाड आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला या तुरुंगाच्या अडचणी सांगितल्या होत्या त्यानंतर आम्ही नवे भांडे , पिठाची गिरणी , गव्हाचे पीठ मळण्याचे यंत्र उपलब्ध करून दिले . उद्यापासून येथे गरम जेवण मिळेल कारण ते यंत्रंही आता आले आहे

समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण आणि चुका थांबल्या पाहिजेत चुका नकळतही होतात हे मान्य आहे पण आयुष्य खूप छोटे आहे याचेही भान असायला पाहिजे गुन्हेगारीमुळे किती कुटुंबे व्यथित होतात याचाही विचार आपण केला पाहिजे उद्या नियमांना अनुसरून प्रशासनाच्या परवानगीने आम्ही येथील कैद्यांना दिवाळी भेट देउ . पण येथून बाहेर समाजात गेलेली व्यक्ती पुन्हा येथे येता कामा नये याचाही झाला पाहिजे पूर्वीच्या चुका पुन्हा होणार नाहीत अशी शपथ घ्या माझी परमेश्वराला तीच प्रार्थना आहे येथे यापुढेही आणखी सुविधा देण्यासाठी अंदाजपत्रक तयार कारण्याचे काम चालू आहे , असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, तुरुंग अधीक्षक पेट्रोस गायकवाड, ज़ेलर जितेंद्र माळी, व सहकारी उपस्थित होते

 

Exit mobile version