Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहरात श्रीराम जन्मोत्सव उत्सहात साजरा

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती जळगाव यांच्यातर्फे प्रभू श्री रामनवमी निमित्ताने शहरातील विविध भागात प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सव व प्रतिमा पूजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील रायसोनी नगर, हरिविठ्ठलनगर, शिवाजीनगर, महर्षी वाल्मीकी नगर, समतानगर, ओम साई नगर, मार्केटयार्ड, आयोध्यानगर, प्रतिमापुजनाच्या कार्यात ह.भ.प. धर्माचार्य, सैनिक कुटुंब, जेष्टनागरीक, महिला यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रीरामांची आरती सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर भोसले, कार्याध्यक्ष सचिन नारळे, सचिव ललीत चौधरी, अमित भाटिया, गोपाल बडगुजर, शशी बियाणी, अशोक राठी, राजू मराठे, नवनाथ दारकुंडे, डी. एन. तिवारी, सचिन अडकमोल, किरण अडकमोल, मुकेश शिंदे, बाळा सोनार यांच्या हस्ते करण्यात आली. यशस्वीवितेसाठी सुरज दायमा,मोहन कुळकर्णी, राहुल परकाळे, दीपक दाभाडे, दिनेश खारकर, विनय बाहेती, मनोज पांडे, आशूतोष दायमा, धनंजय चौधरी, प्रणव नेवे, दीपक नाझरकर, भूषण शिंपी, नाना कोळी, विनय चौधरी, राहुल नेरकर, कुणाल पाटील यांनी प्रयत्न केले.

Exit mobile version