Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात कोरोना योद्धे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कोरोना योद्धे शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, करणी सेना खान्देश अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, समता सैनिक दलचे विजय निकम, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर गायकवाड, पराग कोचुरे, विकास राजपूत, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी, ४२ वेळा रक्तदान करणारे अपंग संघर्ष समितीचे गणेश पाटील, प्रथमच रारक्तदान करणार एक युवकाचा प्रातिनिधिक स्वरूप सत्कार करण्यात आला. याश्वितेसाठी कमलेश देवरे, संतोष ढिवरे, संजय तांबे, भगवान मराठे, प्रमोद पाटील, दिपक सपकाळे, प्रमोद सोनवणे आदींनी कामकाज पहिले. सूत्रसंचालन हरीश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार गोपाल  सोनवणे यांनी केले.

 

 

Exit mobile version