Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहरात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने लोकजागर व्यसनमुक्ती दिंडी सोहळा(व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त चेतना व्यसनमुक्ती आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोकजागर व्यसनमुक्तीची दिंडी सोहळा आयोजित करण्यता आला.

 

मंगळवार दि. ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून जगभर पाळला जातो. आज जगामध्ये प्रत्येक सेकंदाला 8 लोकांचा मृत्यू हा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी नऊ लाख लोक हे तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे मृत्युमुखी पडतात , हे थांबले पाहिजे यामुळेच आजच्या दिवशी चेतना व्यसनमुक्ती केंद्र आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने व्यसनमुक्तीच्या दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते.

प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजुमामा भोळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग तसेच रवींद्र बारी , रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप शर्मा सचिव मनोज जोशी जितेंद्र डाकेविजय वानखेडे संजय विसपुते संजय पगारे डॉ संजय चव्हाण आदी मान्यवर या दिंडीमध्ये सहभागी झालेत या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे श्री जुनागडे यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा वेष परिधान करून व्यसन मुक्तीचा संदेश त्यांनी दिला

आमदार राजुमामा भोळे यांनी या प्रसंगी सांगितले की, दिंडीमुळे सांघीक भावना निर्माण होते व कार्याची पुर्तता होते आपले जळगाव तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासुन दूर राहीले पाहिजे अशी इच्छा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. आपला महाराष्ट्र आपल्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जायचा असेल तर तरुणांनी व्यसनांना नाही म्हटलं पाहिजे असे प्रतिपादन जळगाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी केले

यावेळी रोटरी क्लब चेअध्यक्ष संदीप शर्मा, समाजसेवक विजय वानखेडे, संजय विसपुते यांनी देखील मनोगत व्यक्त केले. व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी तंबाखूजन्य पदार्थ किती घातक असतात याची विस्तृत माहिती दिली. सदरील दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल सोनवणे, महेंद्र सपकाळे, प्रतिक सोनार, सचीन पाटीत, गणेश पाटील, विजय ठोके, सागर डेरे, दिपक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, परमेश्वर मदन, बाळू राखुंडे, दिनेश मोहिते, सुमीत ठोके, शशीकांत माळी, सिध्देश्वर वायाळ आदींनी योगदान दिले. सदरील लोकजागर कार्यक्रमात जळगावकरांनी सहभागी होऊन व्यसनमुक्ती, तंबाखू मुक्तीचा जागर केला. शेवटी जमलेल्यासर्वांनी शपथ घेतली की आम्ही व्यसन करणार नाही व कुणालाही करु देणार नाही.

 

Exit mobile version