Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहरात चोरटी वाळू वाहतूक सुरूच !

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर शुक्रवार २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी एका जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावखेडा शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सावखेडा शिवारातील मराठी शाळेजवळ वाळूची चोरटी वाहतूक करणारे विना क्रमाकांचे ट्रॅक्टर पकडले. चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसल्याने पोलिसांनी एक ब्रॉस वाळूसह ट्र्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिसात ट्रॅक्टरवरील नितीन किसन कुंभार रा. पिंप्राळा, जळगाव यांच्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहेत.

Exit mobile version