Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहरातील गणपती हॉस्पिटल डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. यानुसार कोव्हिड-19 विषाणूमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटल हे अधिग्रहित करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गणपती हॉस्पिटल उद्या गुरुवार १४ मे पासून अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. यात गणपती हॉस्पिटलकडील असलेले मनुष्यबळ, साधन सामग्री, ॲम्ब्युलन्स अधिग्रहीत करण्यात आले आहे. अत्यावश्यक बाब म्हणून हे हॉस्पिटल १४ मेपासून पुढील आदेशापर्यंत डेडिकेटेड कोविड-19 म्हणून घोषित करण्यात आले.

Exit mobile version