Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहरातील खड्डे बनले धोकेदायक ; स्थायीत सदस्यांचा आरोप (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत स्थायी सभेत प्रशासनावर ठपका ठेवण्यात आला. अमृत व मलनिःसारण योजनेंतर्गत शहरातील खड्डे अधिकारी व माक्तेदारामध्ये समन्वय नसल्याने भरले जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

आज स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेत मनपाने भूसंपादन केलेली जागेबाबत न्यायालीन कामाकाजासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बाजू मांडण्यासाठी अॅड. शैलेश पी. ब्रह्मे यांची नियुक्ती करण्यास सर्वानुमते मजुरी देण्यात आली.

खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण
शहरात अमृत व मलनिःसारण योजनेंतर्गत ठीक ठिकाणी खड्डे करून ठेवण्यात आले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. आसाच अपघात होऊन मेहरूणच्या नगरसेविका यांच्या हातास दुखापत झाली असल्याची माहिती नितीन बरडे यांनी दिली. बरडे यांनी अमृत अंतर्गत चालणाऱ्या कामावेळी संबधित भागातील व्हाॅलमनला सोबत घेऊन काम केल्यास नागरिकांचा त्रास कमी होणार असल्याचा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सरिता नेरकर, प्रतिभा देशमुख, प्रशांत नाईक यांनी देखील अमृतच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. सदस्यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत अमृतचे काम चालू असतांना अनावश्यक खोदू ठेवू नये अशा सूचना आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.

शहरात रस्ते दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. मात्र, आकाशवाणी चौक ते महाबळ रस्त्यावरील खड्डे मातीने भरले असल्याची तक्रार नितीन बरडे यांनी केली. शहरातील मुख्य रस्त्यांचीच दुरुस्ती करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मुख्य रस्ते दुरुस्त करून उर्वरित कामे सोडून द्याला असा आरोप प्रशांत नाईक यांनी केला. याला उत्तर देतांना आयक्त कुलकर्णी यांनी शहरातील सर्वच रस्ते दुरुस्त करावयाचे असल्याचे सांगितले. मलनिःसारणचे काम करतांना डिझाईन चुकले असल्याचा दावा नितीन बरडे यांनी केला असता आयुक्त कुलकर्णी यांनी या योजनामध्ये काही त्रुटी असतील मात्र योजनाच चुकीची आहे हे म्हणणे बरोबर नसल्याचे सांगत बरडे यांचे मत खोडून काढले.

 

Exit mobile version