Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहरातील आशिर्वाद नगर भागात रोहित्रभार वाढवा–अमळनेरकरांची मागणी

अमळनेर,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील बऱ्याच भागात वीजभार हा अतिरिक्त असूनही मागील भार प्रमाणे रोहित्र बसविण्यात आले असून त्यावर ग्राहकांची संख्या व वीजभार वाढल्याने शहरातील नगरपालिका हद्दीतिल अतिरिक्त भाराचा विचार करून तात्काळ रोहित्रभार वाढविण्यात यावा अशा आशयाचे निवेदन नगरसेविका गायत्री पाटील, संजय निराधार योजनेचे सदस्य दीपक पाटील यांनी महावितरण कंपनीचे अभियंता व्ही. एस. देशमुख यांना दिले आहे.

 

शहरातील आशीर्वाद नगर, हरिओम नगर, तुकाराम वाडी, कृषिविकास नगर, केले नगर, महात्मा फुले नगर, वामन नगर ढेकु रोड लगत आदी भागात अतिरिक्त भार वाढला आहे. मागील वीज भार प्रमाणेच रोहित्र बसविण्यात आले आहे. मात्र, याठिकाणी यानंतर वीज ग्राहक व वीजभार वाढल्याने तात्काळ जास्तीचा वीजभार असलेले रोहित्र बसविण्यात यावे यासाठी दीपक पाटील यांनी अभियंता श्री. देशमुख यांना या भागात त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. सत्यता निदर्शनास आणून दिली. ढेकु रोड ते पोलीस वसहातीपर्यंतचा भार पडत असल्याने सकाळी याभागात नळाला पाणी आल्यास विद्युत मोटरी बंद पडतात व वीजपुरवठा बंद होतो. यासाठी जास्तीचा भार असलेला रोहित्र तात्काळ बसविण्यात यावा असे यावेळी नगरसेविका गायत्री पाटील, संजय निराधार योजनेचे सदस्य दीपक पाटील यांनी केली. महावितरण कंपनीचे अभियंता यांनी तात्काळ वाढीव भागात लक्ष घालुन रोहित्र बसविण्यात यावे अशीही त्यांनी मागणी केली आहे.

Exit mobile version