Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगावच्या पाणी पुरवठा योजनेसह विकास कामांसाठी निधी देणार-ना. शिंदे (व्हिडिओ)

भडगाव संजय पवार ।  भडगाव शहरासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेला जलसंपदा विभागाची ना हरकतीची अडचण दुर करून त्या योजनेला लवकरच मान्यता देऊ तर जुने मटन मार्केट ते पेठ भागाला जोडणाऱ्या पुलासाठीही आवश्यक निधी देण्याचे आश्वासन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

 

भडगाव येथे नगरपरिषदेच्या मध्यवर्ती शहरातील नगरपरीषद कार्यालय नुतनीकरण, केशवसुत वाचनालय शेजारी शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेचे उदघाटन व अग्निशमन व आणिबाणी सेवा व्हॕन लोकार्पण सोहळा व साईमंदीर येथे आमदार स्थानिक विकास निधीतुन पहिला मजलावरील सभागृह बांधकाम भुमीपुजन सह विविध कामांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, कीशोर पाटील, महापौर जयश्री महाजन, संपर्क प्रमुख संजय सांवत प्रातांधिकारी तथा प्रशासक राजेंद्र कचरे, पं. स. सभापती डाॅ.अर्चना पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत पवार, माजी नगरसेवक डाॅ.प्रमोद पाटील, युवा सेनेचे जिल्हासरचिटणीस लखीचंद पाटील, डाॅ.पुमन पाटील, शंकर मारवाडी, शहरप्रमुख योगेश गंजे, अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख इमरान अली सैय्यद, माजी नगरसेविका योजना पाटील, मुख्याधिकारी विकास नवाळे उपस्थीत होते.  ते पुढे म्हणाले की, आमदार किशोर पाटील यांनी मतदार संघातील पाचोरा व भडगाव नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी मोठ्याप्रमात निधी आणला आहे. भडगाव शहरात वैशिष्टय़पूर्ण योजनेंतर्गत भाजी मार्केट, गिरणा नदिवरील पुल व पाणीपुरवठा योजनेसाठी निधी देऊ असे त्यांनी सांगीतले. त्यांनी बाळद रस्त्यावरील साई मंदिर येथे ही भेट दिली. आमदार कीशोर पाटील यांनी प्रस्ताविक तर सूत्रसंचालन प्रा.डाॅ.दिपक मराठे यांनी केले. 

तसेच यावेळी आरोग्य सेवक संजय सोनार यांनी २००५ नंतर आरोग्य सेवक कर्मचारी पेन्शन मिळावी व शहरात मुस्लीम जनसमुदाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अल्पसंख्याक समाज साठी मल्टीपर्पज हाॕल मिळावा असे निवेदन अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष इम्रानअली सैय्यद यांनी दिले. तसेच २००५ पुर्वीचे शिक्षक यांना पेन्शन मिळावी यासाठी शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने नगरविकास व बांधकाम मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

मंत्रीच्या दौऱ्याच्या निमित्ताने मुख्य रस्त्याचे भाग्य उजळले

भडगाव शहरातील प्रमुख रस्त्यात पावसामुळे खड्डे पडले होते. याकडे नगरपरीषद कडुन दुर्लक्ष केले जात होते. आज नगरविकास व बांधकाम मंत्री नामदार एकनाथ शिंदे हे विविध विकास कामाचे उदघाटन, भुमीपुजन निमित्ताने भडगावात येणार असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यातील खड्ड्याचे भाग्य उजळले व दौऱ्याच्या निमित्ताने प्रमुख रस्त्यातील खड्डे बुजले तर मुख्य रस्ता देखिल न.पा. कर्मचारी कडुन झाडुन पुसुन सफाई करण्यात आली होती.

 

 

Exit mobile version