Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘शरभंग’ वार्षिक नियतकालिकेच्या ५१ व्या अंकाचे प्रकाशन

 

चोपडा, प्रतिनिधी । महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात उनपदेव येथिल शरभंग ऋषींच्या नावाने असलेल्या शरभंग वार्षिक नियतकालिकाच्या ५१ व्या अंकाचे विमोचन संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, संचालक माजी प्राचार्य, प्रा.डी. बी. देशमुख व प्राचार्य. डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले,

‘शरभंग’ नियतकालिकांतून महाविद्यालयात वर्षभर झालेले सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांची तसेच विशेष प्राविण्य संपादित विद्यार्थी शिक्षकांची माहिती अहवाल छायाचित्रांसह विद्यार्थ्यांची विविध विषयांवर असलेले हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेतील कविता, वैचारीक लेख छापून येत असतात.
यंदाचे मुखपृष्ठ कोरोना योद्धाना समर्पित करण्यात आले आहे.
शरभंग या अंकातील लेख, कविता व मुखपृष्ठ ला विद्यापीठ स्तरीय बक्षिसांची उज्ज्वल परंपरा आहे. या कार्यक्रमात यंदाच्या अंकाचे संपादक हिंदी विभाग प्रमुख प्रा. अनिल बाबूलाल सूर्यवंशी यांना त्यांच्या उत्तमकार्यासाठी डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, प्रा. एन. एस. कोल्हे, डॉ. के. एन. सोनवणे, प्रा. बी. एस. हळपे, पर्यवेक्षक प्रा. एस. पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी केले.

Exit mobile version