Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांनी आदिवासी पाड्यावर घेतले भोजन

sharad pawar bhojan

शहापूर । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथील दौर्‍यात आदिवासी पाड्यावरील एका कुटुंबात भोजन घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शुक्रवारी शहापूर दौर्‍यावर होते. भगवान सांबरे रुग्णालय संचलित हेमंत सुपर कर्करोग स्पेशालिस्ट रुग्णालयाचं भूमिपूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आदिवासी पाड्यावरील रामचंद्र खोडके यांच्या घरी जेवण घेतले. याप्रसंगी त्यांनी आदिवासींच्या अडचणी जाणून घेतल्या.

Exit mobile version