Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शबाना आझमीच्या गाडीला मुंबई-एक्स्प्रेसवेवर अपघात

IMG 20200118 WA0070

मुंबई प्रतिनिधी । ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-एक्स्प्रेसवेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या अपघातात शबाना गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच शबाना यांना कळंबोली येथील महात्मा गांधी रुग्णालयात (एमजीएम) दाखल करण्यात आले आहे. शबाना यांच्यासोबत कारमध्ये त्यांचे पती व गीतकार जावेद अख्तरही होते. मात्र अपघातात त्यांना कोणताही इजा झालेली नाही, असे सांगण्यात आले. शबाना यांच्या कारची ट्रकवर मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

Exit mobile version