Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ !(व्हिडिओ)

 

जळगाव,प्रतिनिधी । शहरातील रस्त्यांची कामे मनपाकडून हाती घेण्यात आली असून शनीपेठ परिसरातील प्रभाग ५ मधील रस्त्याच्या कामाचा महापौर भारती सोनवणे, आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

प्रभाग क्रमांक ५ मधील ५ गल्लीतील रस्ते तयार करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने महापौर भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे यांनी बुधवारी कामाची पाहणी केली होती. गुरुवारी दुपारी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शनीपेठेतील स्थानिक नागरिक आणि महापौर भारती सोनवणे, आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगेपाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, अॅड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, मुकुंदा सोनवणे, चेतन सनकत, अमित काळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी उपमहापौर अनिल वाणी, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, मनोज काळे, भारत सपकाळे आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version