शतपावली करत असतांना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील सदोबा नगरात शतपावली करत असलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरी हिसकावून चोरी झाल्याची घटना घडली आहे  याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मालिनी चंद्रकांत पाटील (वय-६४), रा. सदोबानगर, जुना नशिराबाद रोड जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १९ मार्च रोजी रात्री १० वाजता त्या नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. जुना नशिराबाद रोडकडून पायदळ जात असताना अज्ञात दोन जण दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची २१ ग्राम वजनाचे सोन्याची पोत बळजबरी हिसकावून पसार झाले. त्यांनी आरडाओरड केली, तोपर्यंत दोन्ही भामटे दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेबाबत त्यांनी सोमवारी २० मार्च रोजी रात्री उशिरा तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहे.

Protected Content