Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शतपावलीसाठी गेलेल्या रिक्षाचालकाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रात्री जेवण करून शतपावली करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचा रेल्वेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंप्राळा हुडको सबस्टेशन जवळ शनिवारी १ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय नारायण जाधव (वय-५८) रा. बैध्द वसाहत, पिंप्राळा, जळगाव हुडको मयत रिक्षाचालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोमधील बौध्द वसाहतीत संजय जाधव हे आपल्या पत्नी, मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. प्रवाशी रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी १ जुलै रोजी रात्री उशीरा संजय जाधव हे शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. पिंप्राळा हुडकोतील सबस्टेशनजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१७च्या २८ ते २६ दरम्यान अज्ञात धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. रात्री उशीरापर्यंत संजय जाधव हे घरी आले नाही. म्हणून नातेवाईकांना सर्वत्र शोध सुरू केला. जळगाव रेल्वेचे उपप्रबंधक यांनी ही माहिती रामांनद नगर पोलीसांना कळविली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा कयन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन आणि लहान भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी निलेश पाटील करीत आहे.

Exit mobile version