Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शगुन-गिफ्ट अॅन इन्शुरन्स’ ; नवा अपघात विमा

 

मुंबई, वृत्तसंथा ।  विमा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने ‘शगुन-गिफ्ट अॅन इन्शुरन्स’ या अनोख्या वैयक्तिक अपघात विम्याची घोषणा केली आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या सँडबॉक्स नियमांअंतर्गत एसबीआय जनरलने या उत्पादनाची नोंदणी केली आहे.

शगुनमध्ये वैयक्तिक अपघाताचा विमा समाविष्ट असल्याने अपघाती मृत्यू आणि काही प्रमाणात किंवा पूर्ण अपंगत्व आणि अपघातामुळे कायमस्वरुपी किंवा तात्पुरत्या प्रकारची अक्षमता येणे यासारख्या आकस्मिक घटनांपासून विमाधारकाला संपूर्ण आर्थिक संरक्षण मिळते. या विमा योजनेतील अनोखे वैशिष्ट्य म्हणजे हा विमा तुम्ही कोणालाही भेट देऊ शकता. यासाठी विमा खरेदी करणारी व्यक्ती विमाधारकाच्या नात्यातच असणे आवश्यक नाही.

शगुन हे एसबीआय जनरलचे अनोखे उत्पादन आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत आपण आपल्या महत्त्वाच्या क्षणांना किंवा शुभ प्रसंगी काहीतरी भेटवस्तू किंवा पैशांचं पाकिट देऊन ते क्षण साजरे करतो. हे शुभेच्छा आणि सुदैवाचे ते प्रतिक असते. ‘एसबीआयजी’मध्ये या ‘शगुन’ संकल्पनेला सुरक्षेची एक मौल्यनवान भेटवस्तू बनवून त्यापद्धतीने सादर केले आहे. या उत्पादनाचा प्रीमिअमही ५०१, १००१ आणि २००१ असा ठेवण्यात आला आहे. अशारितीने फक्त ‘शगुन’ हे नावच नाही तर प्रीमिअमच्या रकमेनेही आपल्या भारतीय संस्कृतीला स्पर्श केला आहे.

Exit mobile version