Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्ही.एच. पटेल प्राथमिक विद्यालयात उन्हाळी तयारी वर्गाचा शुभारंभ

चाळीसगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालय, श्याम भगवानदास अग्रवाल बालक मंदीर व आनंदा सुपडू वाणी शिशूविकास मंदीर या शाळांमधील सिनियर बालक मंदिरातून इयत्ता पहिलीत दाखल होणारे आणि इयत्ता १ लीतून २ री मध्ये जाणा-या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंददायी उन्हाळी सुट्टीतील’ तयारी वर्गाचा शुभारंभ मंगळवारी १८ रोजी सकाळी ९ वाजता शाळा समितीचे चेअरमन योगाचार्य तात्यासाहेब क.मा.राजपूत, बांधकाम समितीचे चेअरमन व शाळा समितीचे सदस्य जितेंद्रभाऊ वाणी यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक नाना मोरे, ज्येष्ठ शिक्षिका मंजुषा नानकर, सुजाता मोरे, जिजाबराव वाघ, बालक मंदिर विभागाच्या प्रमुख रंजना चौधरी आदि उपस्थित होते. तात्यासाहेब क.मा. राजपूत यांच्यासह जितेंद्रभाऊ वाणी, नाना मोरे आणि मंजुषा नानकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तयारी वर्ग हे निःशूल्क असून विद्यार्थ्यांना हसत – खेळत अध्यापन करण्यात येत आहे. सकाळी ८ ते १० या वेळात वर्ग भरणार आहे. शुभारंभालाच १०० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

 

सूत्रसंचालन व प्रास्ताविक जिजाबराव वाघ यांनी केले. यशस्वितेसाठी इयत्ता १ ली व २ रीचे वर्गशिक्षक त्रिशला निकम, मनिषा सैंदाणे, अनिल महाजन, राजश्री शेलार, शर्वरी देशमुख, अजय सोमवंशी, सचिन चव्हाण, प्रशांत महाजन, स्मिता अमृतकार, ज्योती कुमावत, कविता साळुंखे, रेखा चौधरी यांच्यासह दत्तात्रय गवळी व बालक मंदिर व आनंदा सुपडू वाणी शिशूविकास मंदिरातील शिक्षिका वृंद सहकार्य करीत आहे.

 

Exit mobile version