Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘व्हाइट हाउस’ने पंतप्रधान मोदींसह सहा ट्विटर हॅण्डलला केले अनफॉलो

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाउसने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर अचानक अनफॉलो केले आहे. दरम्यान, व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदीच नव्हे तर, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवनासहित सहा ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

 

कोरोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. व्हाइट हाउसने अचानकपणे त्यांना अनफॉलो का केले?, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्यानंतर व्हाइट हाउसच्या ट्विटर हॅण्डलने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कार्यालयाला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. सध्या व्हाइट हाउस १३ जणांना ट्विटरवर फॉलो करत असून हे सर्वजण अमेरिकन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.

Exit mobile version