Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यावसायिकाला मारहाण करुन अंगठीसह रोकड लांबविणाऱ्या चोरट्याला अटक

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील ऑडीटर कॉलनीत व्यावसायिकाला मारहाण करुन त्यांच्याकडील रोकड तसेच हातातील अंगठी असा ३ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

निलेश मिलिंद जाधव रा. पिंप्राळा मढी चौक असे संशयिताचे नाव आहे. जळगाव शहरातील मुक्ताई पार्क परिसरात सुरेंद्रकुमार शंकरलाल राका वय ५२ हे वास्तव्यास आहेत. ऑडीटर कॉलनीत सुरज ज्वेलर्स येथे १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरेंद्रकुमार राका यांना एकाने मारहाण करुन त्यांच्याजवळील २ हजार ५७० हजार रुपयांची रोकड तसेच १ हजार रुपयांची नवग्रहाची अंगठी जबरीने चोरुन पसार झाला. घटनेनंतर सुरेंद्र कुमार राका यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली.

या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या संशयित नितेश मिलिंद जाधव रा. पिंप्राळा मढी चौक, यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

Exit mobile version