Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यापाऱ्याने व्यापाऱ्यास ८३ लाखात गंडविले – पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील मोंढाळे रोडवरील कोल्ड स्टोरेजमधून हरभरा धान्य खरेदी करून पहुरच्या व्यापाऱ्यास सदर मालाचे पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ करत असल्याने शहादा येथील व्यापाऱ्याविरुध्द पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील कृष्णा कोल्ड स्टोरेज व किरण कोल्ड स्टोरेज मध्ये बालाजी प्रो.प्रा.चे मालक अनिल उत्तम जैन रा. पहुर पेठ, ता. जामनेर यांनी हरभरा धान्य हे भाडेतत्त्वावर ठेवले होते. दरम्यान शहादा येथील निखिल ट्रेडर्सचे मालक निखिल हेमराज गेलडा यांनी अनिल जैन यांचेकडून दि. १० जून आणि दि १४ जून रोजी एकूण ७७ लाख २० हजार २५२ रुपये किंमतीचा हरभरा तसेच अनिल जैन यांचा मुलगा दिनेश अनिल जैन यांनी देखील निखिल ट्रेडर्स चे मालक निखिल गेलडा यांना ५ लाख ७६ हजार ५३३ रुपयांचा माल विकला होता. सदर मालाचे पैसे माल खरेदी केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी देण्याचे ठरले होते. मात्र एक महिना उलटूनही मालाचे पैसे मिळाले नसल्याने व निखिल गेलडा हे वारंवार खोटी आश्वासने देवून वेळ मारुन नेत असल्याने अनिल उत्तम जैन यांच्या फिर्यादीवरून दि. १६ ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये निखिल ट्रेडर्सचे मालक निखिल हेमराज गेलडा रा. श्रीराम कॉलनी, नंदुरबार यांचेविरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.

Exit mobile version