Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यापाऱ्याची दुचाकी लांबविल्याऱ्या चोरट्याला शहर पोलिसांकडून अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील सानेगुरुजी चौकातील फ्रुट गल्लीतून व्यापाऱ्याची दुचाकी लांबविल्याप्रकरणी शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दुचाकी चोरुन नेणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे.

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील विजय शांताराम अमले वय ४६ हे व्यापारी १४ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील सोनगुरुजी चौकातील फ्रुट गल्लीत कामानिमित्ताने आले होते. यादरम्यान त्यांची विनानंबरची दुचाकी सानेगुरुजी चौकात उभी केली होती. काम आटोपून परतल्यावर दुचाकी आढळून आली नव्हती. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने दोन दिवसांनंतर विजय अमले यांनी शुक्रवारी शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यात पोलिसांनी चोरट्याला अटक करुन त्याच्याकडील दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version