Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वॉटरग्रेस व मनपाचा सावळा गोंधळ उघड : अभिषेक पाटील (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । वॉटरग्रेस कंपनी व मनपाच्या करारात वाहनांच्या रिपेअरचा  खर्च वॉटरग्रेस कंपनीने करावा असे ठरलेले असतांना मनपा तो खर्च का उचलत आहे यासह इतर प्रश्न राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी उपस्थित केले आहेत. 

वॉटरग्रेस कंपनी ला या आधीच आपल्या कंगाल मनपा ने मोठ्या उदार मनाचे होऊन वाहने विकत घेऊन दिलेले असताना त्यावर किरकोळ किंवा मोठ्या नुकसान किंवा रिपेअरचा खर्च हा वॉटरग्रेसने करावा हे त्या च्या झालेल्या कारारनाम्यात स्पष्ट पणे मुद्दा क्र इ नमूद असताना देखील या चा खर्च मनपा का करत असेल ? दि ४  मे २०२१  रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत संविदेत मुद्दा  क्र ८  मध्ये सदरील वाहनांच्या लोखंडी कप्पे सुधारण्यासाठी १३ हजार ९००  रु प्रमाणे ८५  गाड्याच्या दुरुस्तीसाठी ११ लाख ८१ हजार ५००  रु चा खर्चास मंजुरी देऊन सदरील काम पूर्ण करण्यात आले आहे …

प्रश्नः आहे की –

१.  सदरील वाहने आरोग्य विभागाने GM पोर्टल वरून खरेदी करीत असताना ही गोस्ट लक्षात कशी आली नाही ? (कप्पे कसे हवेत )

२.  दुरुस्ती चा खर्च हा वॉटरग्रेस कडून का घेतला गेला नाही ?

३. जळगावकर यांनी भरलेल्या कराची अशीच उधळपट्टी चालणार का ?

४. वॉटरग्रेस वर इतकी मेहरबानी का ?

 अश्या छोट्या छोट्या चोऱ्या करूनच यांचा पण आकडा  माघील झालेली घोटाळ्या सारखा तर होणार नाही ना ???

ज्या ज्या अधिकाऱ्यांची यास मूक संमती होती त्या च्या कडून या रकमेची वसुली का करण्यात येऊ नये ?

 

 

 

Exit mobile version