Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वैशाली हिंगे यांच्या बदलीला स्थगिती देण्यास मॅटचा नकार

जळगाव : प्रतिनिधी । नुकत्याच बदली झालेल्या तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या बदलीला स्थगिती देण्यास मॅटने नकार दिला आहे.

जळगावच्या तहसीलदार वैशाली हिंगे यांची नुकतीच नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्पात उपसंचालक या पदावर बदली झालेली आहे. बदली विहित कालावधीच्या आधी झाली असल्यामुळे रद्द करण्यात यावि अशी मागणी वैशाली हिंगे यांनी केली होती. या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र सेवा प्राधिकरण अर्थात मॅट कडे धाव घेतली होती.

दरम्यान वैशाली हिंगे यांनी मॅटमध्ये अपील दाखल केल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी मॅटमध्ये त्रयस्थ अर्जदार याप्रकारे अर्ज दाखल करत हिंगे यांची बदली रद्द करण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. यावर आज महाराष्ट्र सेवा प्राधिकरण मध्ये सुनावणी झाली यात मॅटने दीपक कुमार गुप्ता यांचा त्रयस्थ अर्जदार म्हणून अर्ज निकाली काढला. तथापि वैशाली हिंगे यांच्या बदलीस नकार देखील देण्यात आलेला आहे. यामुळे हिंगे यांना तूर्तास दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर त्यांच्या अपिलावर पुढे सुनावणी होणार आहे

 

Exit mobile version