Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वैवाहिक जीवनातील सुसंवादावर जळगावात उद्या संजय सिंघी यांचे व्याख्यान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वैवाहिक जीवनातील सुसंवादाबाबत उद्या शहरात रायपूर येथील ज्येष्ठ काऊन्सीलर संजय सिंघी यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भगवान महावीर जयंती निमित्त भारतय जैन संघटना अर्थात बीजेएसच्या वतीने जळगावातील बालगंधर्व नाट्यगृहात उद्या संजय सिंघी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजातील बंधू भगिनींना विशेष करून तरुण नवयुवक आणि  युवतींना  यासाठी आयोजकांनी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. वैवाहिक जीवनात अपयश आणि नात्यात दुरावा , ही एक समस्या? या विषयावर रायपूर निवासी संजय सिंघी हे मार्गदर्शन करणार आहेत.

 

अगदी लहान सहान कारणा वरून वैवाहिक नात्यात दुरावे निर्माण होतात व त्यातूनच घटस्फोटा पर्यंत च्या समस्या निर्माण होत आहेत. हया समस्या प्रत्येक समाजात कमी जास्त प्रमाणात आहेत. यावर मात कशी करावी याबाबत सिंघी हे मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवार दिनांक ४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. याला उपस्थित राहण्याचे आवाहन बीजेएसतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version