Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वैद्यकीय निर्देश व अंतराचे नियम पाळून आता जि . प . , प . स च्या सर्व सभा पूर्ववत

 

 

जळगाव : प्रतिनिधी । वैद्यकीय निर्देश व अंतराचे नियम पाळून आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण सभांसह विषय समित्यांच्या सभा पूर्ववत घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे . कोरोना संक्रमणामुळे या सभा आधी फक्त व्हिडीओ कॉन्फरंसिंगनेच घ्याव्या असे बंधन घालण्यात आले होते ते आता दूर झाले आहे

कोरोना संक्रमणामुळे राज्य सरकारने या सभा फक्त व्हिडीओ कॉन्फरंसिंगनेच घ्याव्या असे आदेश २५ ऑगस्ट रॉकी दिले होते मात्र राज्यातील दुर्गंम भागातील जिल्हा परिषद आन पंचायत समित्यांना व्हिडीओ कॉन्फरंसिंगने सभा घेण्यात अडचणी येत होत्या तशी माहिती राज्य सरकारला देण्यात आली होती राज्यात सर्वत्र इंटरनेट सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे अशा सभा सर्वत्र शक्य होत नव्हत्या

या वास्तवाचा विचार करून आता वैद्यकीय निर्देश व अंतराचे नियम पाळून आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण सभांसह विषय समित्यांच्या सभा पूर्ववत घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे तसे आदेश ग्रामविकास खात्याचे कार्यासन अधिकारी सुहास जाधवर यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना १५ डिसेंबर रोजी दिले आहेत

Exit mobile version