Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वेळोदे येथे विलगीकरण केंद्राचे होणार उद्घाटन

 

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील वेळोदे येथे लोकवर्गणीतून उद्या गुरुवार दि.१९ रोजी ग्रामपंचायत व देणगीदारांच्या  सहकार्याने जि.प.शाळेत विलगीकरण केंद्राचे उद्घाटन तहसीलदार यांच्या हस्ते होणार आहे. 

गावातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांनी गुरुवार दि. १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता जि.प शाळेत हजर रहावे.  जेवणासाठी संपुर्ण किराण्याची व युज अॅन्ड थ्रो जेवणाच्या प्लेटची व्यवस्था विजय नेमीचंदजी जैन हे करुन देत आहेत. दररोजच्या नाश्त्याची व आॅक्वाच्या पाण्याची  सुविधा अरुण प्रल्हादराव सोनवणे हे करुन देत आहेत. दोन वेळेची चहाची व्यवस्था संजय नारायण बोरसे हे करुन देत आहे.

जि. प. शाळेत दोन खोल्यांचे सॅनेटाइझरद्वारे निर्जंतुकीकारण करण्यात आलेल्या आहेत. यासाठी मोलाचे सहकार्य मनोज बोरसे, ग्रामसेवक, पोलीस पाटील, वसंत करंदीकर, ग्रामपंचायत कर्मचारी शरद बोरसे, प्रफुल्ल, यांचे लाभत आहे.  दररोजच्या स्वयंपाकासाठी व गाद्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने ज्यांना निधी द्यावे असे वाटत असेल अशा देणगीदारांनी सुप्रभात फर्टीलायझर येथे देण्याचे करावे. 

उद्या  विलगीकरण केंद्राच्या उद्घाटनाला  चोपड्याचे कृती समितीचे अध्यक्ष एस. बी. नाना डाॅ.देवराज, डाॅ.प्रदीप लासुरकर, डाॅ.राहुल पाटील  हे उपस्थित राहणार आहेत. गावातील घरात विलगीकरणात असलेल्या पुरुषांना शाळेतच शासन आदेशानुसार राहावे  लागेल आणि पॉझिटीव्ह रुग्ण गावात फिरताना आडळल्यास त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात येणार येणार आहे. या केंद्रात आशावर्करांचेही मोलाचे सहकार्य राहणार आहे. विलगीकरण केंद्रात  औषधोपचार हातेड प्राथमिक उपकेंद्रमार्फत केले जाणार आहेत.

Exit mobile version