Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वेब मीडिया असोसिएशन बोदवड तालुका कार्यकारणी जाहीर

बोदवड, प्रतिनिधी । वेब मीडिया असोसिएशनची बोदवड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी जाफर मणियार तर तालुका उप अध्यक्षपदी सचिन पाटील यांची निवड करण्यात आली. 

जळगाव जिल्ह्यात वेब मीडिया असोसिएशनला वेब पोर्टल पत्रकार यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल पत्रकार यांनी या संघटनेत सामील होताना दिसून येत आहे. आज बोदवड येथे वेब मीडिया असोसिएशन रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संगठना राज्यभर कार्यरत असून वेब मीडिया एकमेव संघटना आहे. संगठनेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया अध्यक्षतेखाली, जिल्हाउपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हासचिव दिनेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस अमोल व्यवहारे, जिल्हा संघटक एस एन भुरे याच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.  बोदवड येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते बोदवड तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली

बोदवड तालुका अध्यक्ष जाफर मणियार, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, तालुका सचिव रामेश्वर लोहार, तालुका सरचिटणीस विशाल तांगडे, तालुका समन्वयक गजानन बेलदार, तालुका खजिनदार अकरम शेख, तालुका सदस्य जितेंद्र गायकवाड, शाहरुख शेख, सुरेश कोळी यांची निवड करण्यात आली.

वेब मीडिया असोसिएशन बोदवड तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.

 

Exit mobile version