Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृध्दाला लुटणार्‍या आणखी दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांकडून अटक

जळगाव प्रतिनिधी । जळगावला सामान खरेदीसाठी आलेल्या जामनेर येथील वृध्दाला रिक्षात बसवून त्यांच्याकडील २५ हजार रुपये लांबविल्याऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. 

अशरद उर्फ अण्णा शेख हमीद वय २२ रा. गेंदालाल मिल व अशरफ गफार पिंजारी वय २० रा. फातीमा नगर, एमआयडीसी अशी संशयितांची नावे आहे. जामनेर येथील अब्दुल कलीम अब्दुल गफुर शेख वय ५९ हे ८ जून रोजी जळगाव येथे साहित्य खरेदीसाठी आले होते. यादरम्यान अजिंठा चौफुलीवर उतरल्यावर तेथून चित्राचौक जाण्यासाठी रिक्षात बसले. रिक्षात पूर्वीत तीन जण बसले होते. नेरीनाका स्मशानभूमीजवळ रिक्षा आली असतांना, तिघांनी अब्दुल शेख यांना धक्काबुक्की करुन त्याच्याकडील २५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांना रिक्षातून उतरवून देत, कुणाला काही सांगितले तर मारुन टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी अब्दुल शेख यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोहसीन खॉंन नूर खॉन वय २७ रा. गेंदालाल मिल व शाहरुख शेख रफीक शेख वय १९ रा. पिंप्राळा हुडको या दोन संशयितांना अटक केली होती. त्याच्याकडून रिक्षा तसेच १५ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली होती. 

तर अशरफ पिंजारी व अरशद मुलतानी हे दोघे संशयित फरार होते. दोघेही गुरुवारी जळगाव शहरात आले असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद, सुधीर साळवे, हेमंत केळकर, चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने गेंदालाल मिल व फातिमानगर दोघांना अटक केली

Exit mobile version