Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृध्दाचे मेहरूण येथील घराची परस्पर विक्री करून फसवणूक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा येथील राहणाऱ्या वृद्धाचे मेहरूण शिवारातील मालकीचे बांधलेले घर परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात गुरुवार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात जळगाव दुय्यम निबंधक विभागातील कर्मचारी, तलाठी यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा भागात वंचित वसंत तुकाराम भंगाळे, (वय-७५) हे वयोवृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या मालकीची मेहरूण शिवारात शेत सर्वे नंबर २१/१ ब मध्ये असलेला प्लॉट नंबर-१३ यातील त्यांच्या हिस्स्याची  १००८ स्क्वेअर फुट जागा त्यांच्या मालकीची आहे. या जागेत एक मजली बांधकाम केलेले आहे. ही जागा त्यांच्या पत्नीचे नावे होती, दरम्यान त्यांची पत्नी मयत झाल्यानंतर वारस म्हणून वसंत भंगाळे यांचे नाव लावलेले आहे. असे असताना मोहम्मद इरफान मोहम्मद तांबोळी रा. मेहरून याने वसंत भंगाळे यांची पूर्वपरवानगी न घेता १६ जुलै २०१० ते २२ जुलै २०२२ दरम्यानच्या काळात कटकारस्थान करून परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला. यासंदर्भात त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मोहम्मद इरफान मोहम्मद तांबोळी (रा. मेहरूण जळगाव), मोहम्मद इदरीस मोहम्मद खलील (रा. कानळदा रोड, भुसावळ), अशोक समोजी माळी रा. संतोषी माता नगर, रमेश शंकर पाटील (रा. सदाशिव नगर, जळगाव), जगदीश दौलत पाटील (रा. राम नगर, जळगाव), सहनिबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी करणारे कर्मचारी, मंडळाधिकारी राजेश शंकर भंगाळे आणि मेहरूण शिवारातील तलाठी राजीव कडू बाऱ्हे अशा ८ जणांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी  ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहे.

Exit mobile version