Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृद्ध कलावंत निवड समिती जाहीर; चंद्रकांत भंडारी व विनोद ढगेंचा समावेश

 

जळगाव प्रतिनिधी । वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत वृद्ध साहित्यिक कलावंताची निवड समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप विलास पाटील महाराज वरसाडेकर यांची निवड झाली असून ज्येष्ठ साहित्यीक चंद्रकांत भंडारी व नाट्यकर्मी विनोद ढगे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

राज्याचे स्वच्छता वा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीने या निवड करण्यात आल्या आहेत. जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी व जिल्हा सामाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी ही निवड जाहीर केली आहे. राज्य शासनामार्फत मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना राबवण्यात येते. या योजनेअतर्गत जिल्ह्यात दर वर्षी मानधनासाठी १०० पात्र कलावंतांची निवड केली जात असून प्रतिमहा २२५० रुपये, प्रमाणे वार्षिक २७००० रुपये मानधन दिले जाते. सन-२०१९-२० व सन-२०२०-२१ या दोन वर्षात २०० कलावंतांची निवड करावयाची आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचार संहिता संपल्यावर जानेवारी अखेरपर्यंत समितीची बैठक होणार असल्याचेही विभागाने कळवले आहे.

या समितीत अध्यक्ष प्रदीप विलास पाटील (गजानन महाराज वरसाडे ), सदस्य चंद्रकांत प्रभाकर भंडारी. भाऊलाल रामभाऊ पाटील (मुक्ताईनगर), विनोद डीगंबरराव ढगे, दत्तू नथ्थू सोनवणे (भोकर ) यांची निवड करण्यात आलेली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही समिती गठीत करण्याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या सदस्य सचिवपदी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतील. तर संजय गांधी योजनेचे तहसीलदार यांची सदस्य म्हणून सर्व गट विकास अधिकारी हे पदसिद्ध सदस्य आहेत.

Exit mobile version