Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृक्ष संवर्धन म्हणजे भावी पिढयांचा आरोग्य विमा या दृष्टिने प्रत्येकाने तरतूद करा

जळगाव, प्रतिनिधी । वृक्षसंवर्धन म्हणजे भावी पिढयांचा आरोग्य विमा या दृष्टिने प्रत्येकाने तरतूद करा असे आवाहन कवायित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी.पी. पाटील यांनी केले.

जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांचे स्व . पिताश्री किसन नाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे आयोजित १०१ वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू पाटील बोलत होते.

दि. २६ सप्टेंबर २०२० रोजी निवृत्ती नगर येथील कार्तिक स्वामी मंदिराच्या प्रांगणात कुलगुरू पाटील यांच्या हस्ते नीम , चिंच , सीताफळ या वृक्षांचे रोपण करून अभियानास प्रारंभ झाला .त्याप्रसंगी नगरसेविका निता सोनवणे ,नगरसेविका प्रतिभा देशमुख ,नगरसेवक विजय पाटील , विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक फौजदार विश्वासराव पाटील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कै . किसन नाले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कुलगुरू यांनी केले.

पर्यावरण मंडळाचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांनी वृक्षारोपणाची जन चळवळ होण्यासाठी कृती कार्यक्रम, नियोजन व कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करून मंडळाचे ध्येयधोरणे व उद्दिष्ट्ये सांगितली. नगरसेविका नीता सोनवणे यांनी स्व. नाले यांचे सामाजिक कार्य सांगितले. सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख यांनी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी कोविळ महामारी काळात कलेक्टर ऑफिस सह सर्व शासकीय कार्यालयांना मोफत सॅनिटरेरायजेशन व दररोज ४०० स्थलांतरित मजूर व दीनदलितांना प्रतिष्ठानतर्फेअन्नदान करून वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा निष्ठेने चालवित असल्याबद्दल गौरवोद्गार काढले.

मंदिर परिसरात नगरसेविका नीता सोनवणे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, नगरसेवक विजय पाटील, पर्यावरण मंडळाचे सहसचिव विजय लुल्हे, सहायक फौजदार विश्वासराव पाटील , विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दिपक दाभाडे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने विजय लुल्हे प्रकाशित गांधीजींचे सात सामाजिक पातके व एकादश व्रते पोस्टर्स कुलगुरू पी. पी. पाटील तसेच मान्यवरांना लुल्हे यांनी सन्मानपूर्वक भेट दिली.

कुलगुरू यांच्या हस्ते एस. के. पवार यांना वृक्ष दान करण्यात आले. कार्यक्रमास दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. वासुदेव पाटील, सर्पतज्ञ विवेक देसाई, राहुल लोखंडे, प्रशांत सुर्वे आणि परिसरातील वृक्षप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनमत प्रतिष्ठानचे सदस्य हर्षाली पाटील, वेदांत नाले,चित्रा मालपाणी, सौ .भारती नाले यांचे सहकार्य लाभ . सुत्रसंचालन विजय लुल्हे यांनी केले.

Exit mobile version