Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वुहानच्या लॅबमधून कोरोना व्हायरसची उत्पत्तीचे पुरावे मी पाहिले : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) वुहानच्या लॅबमधून कोरोना व्हायरसची उत्पत्तीचे पुरावे मी पाहिले आहेत. पण त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकत नाही, असे सांगत वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या लॅबमधूनच कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाल्याचा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. व्हाइट हाऊसमध्ये ते बोलत होते.

 

वुहानच्या लॅबमधून करोना व्हायरसची उत्पत्ती झाल्याचे तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहात, तुम्ही पुरावे पाहिले आहेत का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. त्यावर ‘हो, मी पुरावे पाहिले आहेत. पण त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकत नाही’ असे उत्तर दिले. अगदी यासंबंधीचे पुरावे देण्यासही त्यांनी नकार दिला. चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या इंटर्नकडून अपघाताने कोरोना व्हायरस लीक झाला असावा, असे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. तर दुसरीकडे वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबने त्यांच्यावर होत असलेले आरोप आधीच फेटाळून लावले आहेत. त्याचप्रकारे वुहानमधल्या मासळी बाजारातून कोरोना व्हायरसची सुरुवात झाली. प्राण्यांमधून हा आजार माणसामध्ये आला असे काही तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, अमेरिकेत १० लाखापेक्षा जास्त लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली असून ६३ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, असा कुठलाही विषाणू बनवण्याचा आमचा हेतू नाही आणि आमच्याकडे तशी क्षमताही नाही, असे चीनने स्पष्ट केलेले आहे.

Exit mobile version