Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्यावतीने सगर उत्सव साजरा

जळगाव, प्रतिनिधी | वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्यावतीने दिवाळी पाडवा व बलीप्रतिपदा (रेडा, म्हैश पूजन) सगर उत्सव साजरा करण्यात आला.

 

 

महाभारत काळात भगवान श्री कृष्णानी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते. तेव्हापासुन सगर पूजनाची (रेडा, म्हशी पूजन) सुरवात झाली आहे असे जुने जाणकार सांगतात. पारंपरिक दुग्ध व्यवसायानिमित्त गवळी समाज बांधव दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदानिमित्त सगर उत्सव साजरा करतात. आगामी काळात व येणाऱ्या नववर्षात राज्यासह देशात व समाजात अघटित संकट येऊ नये म्हणून गाई-म्हशी लक्ष्मीचे स्वरूप आणि यम राजाचे वाहन रेडा यांचे दिवाळी पाडव्यानिमित्त सगर पूजन केले जाते. वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठीही परंपरा आजही जोपासत आहे.

 

दिवाळी पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गवळी समाज बांधव एकत्र जमतात. या उत्सवाचे महत्त्व म्हणजे सगर अर्थात रेड्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. जळगाव शहरात मोहाडी रोड परिसर तसेच शिरसोली गवळी वाडा परिसरात वीरशैव लिंगायत गवळी समाज दैव पंच मंडळ व समाज बांधवांकडून हा सण साजरा करण्यात आला. यावेळी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुद्देशीय संस्थेचे जिल्हा अध्यक्ष दिपक जोमीवाळे, युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे, सचिव नारायणराव बारसेसह सचिव अशोक जोमीवाळे, शंकर काटकर, विशाल बारसे, जेष्ठ पंच भागवतआप्पा बारसे, साहेबराव बारसे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version