Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; तीन महिन्यापासून डीपी उघडीच (व्हिडिओ)

भुसावळ, प्रतिनिधी । येथील जामनेर रोडवरील डीपी तीन महिन्यापासून उघडी असल्याने वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवितेला धोका निर्माण झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, जामनेर रोडवरील हॉटेल रांगोली जवळील रस्त्यावर महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने आनंद नगर भागातील नागरिकांसाठी वीज पुरवठा करण्यासाठी डीपी लावलेली आहे. ही डीपी तीन महिन्यापासून उघडी असल्याने येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. रात्री या डीपीला एक वेडसर हात लावण्याचा प्रयत्न करीत असतांना त्या भागातील काही तरुणांनी त्याला काठीने मारून त्या भागातून हलकून लावले. जर कोणी नसते तर एखादी दुर्दवी घटना नक्की घडली असती. यासाठी वीज वितरण कंपनीने डीपीला व्यवस्थित चारही बाजूने बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

 

Exit mobile version